news

राज्यात ४ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

मुंबई। दि. ४ ऑक्टोबर २०२५: परतीच्या मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतला. मात्र, प्रत्यक्षात पाऊस कोसळतच आहे. आधी मोंथा चक्रीवादळाने तडाखा दिला. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा फटका बसणार आहे. मंगळवार, बुधवारीही नाशिकमध्ये हलका तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस कोकण पट्ट्यात पाऊस होईल. चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्याप्रकरणी पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यावर गुन्हा दाखल

बुधवारपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात ७ नोव्हेंबरनंतर थंडी सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790