नाशिकमध्ये चार दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, जळगावला उष्णतेची लाट…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात मंगळवार, २८ मेपासून आगामी चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार असून जळगाव येथेही दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. नाशिकसह उर्वरित राज्यात ४ दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार 'कुंभ कक्ष'; सिंहस्थ २०२७ साठी विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू

सोमवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४७.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. महाबळेश्वर येथे नीचांकी २२.० अंश सेल्सियस तापमान होते. राज्यात १७ शहरांत पारा चाळिशीपार होता. विदर्भ व जळगाव वगळता राज्यात उन्हाचा तडाखा कमी झाला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790