नाशिक: अवैध सावकार वैभव देवरेला कोर्टात आज हजर करणार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारीतून महिलेकडून बळजबरीने खंडणी स्वरूपात वाहने ओढन नेत महिलेचा विनयभंग प्रकरणात पोलिस कोठडीत असलेला वैभव देवरे याची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि. २६) संपत आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात देवरे आठ दिवस पोलिस कोठडीत होता.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्याचा पुन्हा ताबा घेत तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. देवरे याच्या विरोधातील एका गुन्ह्यात त्याला आठ दिवस कोठडी सुनवण्यात आली होती. या गुन्ह्यात एसआयटी पथकाने देवरेची तब्बल ४० कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता शोधून काढली आहे. ही मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790