नाशिक (प्रतिनिधी): श्रीराम नवमीनिमित्त रविवारी (दि. ६) काळाराम मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाकडील रस्ता अरुंद असल्याने मार्गावरील रहदारीने कोंडी होण्याची शक्यता असल्याने मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
सरदार चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा मार्ग दोन्ही बाजूने येण्या-जाण्याकरीता, लक्ष्मण झुला ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा दोन्ही बाजूचा मार्ग, शनी चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा मार्ग, शिवाजी चौक ते सितागुंफाकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजुने येण्या-जाण्याकरीता सकाळी ५ ते रात्री १२ पर्यंत सर्व वाहनांना बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग : सरदार चौक ते काळाराम मंदिर, लक्ष्मण झुला ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, शिवाजी चौक ते सिता गुंफाकडे जाणारा मार्ग सुरू राहिल. वाहनचालकांनी इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.