नाशिक। दि. २३ जानेवारी २०२६: भारतीय हवाई दलाच्या वतीने गंगापूर धरण येथे एअर शो ला प्रारंभ झाला. कार्यक्रम बघण्यासाठी गंगापूररोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रोडवर वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये यासाठी गंगापूर रोडने आनंदवली गाव येथून बारदान फाटा, गंगापूर गाव मार्गे गिरणारे गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद केला आहे.
पर्यायी मार्गाहून वाहतूक वळवण्यात आल्याने किरकोळ कोंडी वगळता नियोजन सुरळीत होते. शुक्रवारी (दि. २३) वाहतूक नियोजन कायम असून चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
👉 एअर शो कडे जाणारे मार्ग:
पार्किंग १ ते १५ मखमलाबाद रोडने जातील व येतील तसेच सुला वाइनकडे जाणाऱ्या वाहनांनी गेट नंबर ८, ९ ने जावे यावे, पार्किंग १६, १७ कडे जाणारी वाहने गोवर्धन फाट्यावरुन जातील व येतील.
🚫 प्रवेश बंद मार्ग: आनंदवली गाव, दुगाव फाटा, मार्गे गिरणारे, धोंडेगाव, देवरगाव आणि हरसुलकडे जाणारी सर्ववाहने (पासधारक हलके वाहने वगळून) सकाळी ८ ते एअर शो संपेपर्यंत प्रवेश बंद राहिल.
⤴️ पर्यायी मार्ग: आनंदवलीतून चांदशी पुलावरून, मुंगसरे फाटा जवळ दुगाव मार्गे जातील व येतील. भोसला स्कूल गेट, सावरकरनगर रोडने बापू पुलावरून चांदशी मुंगसरे फाट्याजवळ दुगाव मार्गे.
![]()


