नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात सोमवारी (दि.१५) विदर्भ, मराठवाडा व कोकण वगळता मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला होता. भुसावळला उच्चांकी ४२.९ तापमान नोंदवले गेले.
मालेगावी ४२.६ तर नाशिकला या हंगामात पहिल्यांदाच पारा चाळिशीपार जाऊन ४०.४ तापमान नोंदवले गेले. दोन दिवस मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट रहाणार आहे, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला असून तेथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
१७ एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातही ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर वातावरणात अचानक बदल होऊन देवळा, सुरगाणा, हरसूलला अवकाळी पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यातील बाहे परिसरात सुमारे एक ते दीड तास पाऊस ३० टक्के नुकसान झाले.