नाशिक: अवैध सावकार वैभव देवरेने ४ लाख रुपयांचे उकळले २८ लाख; १८ पर्यंत पोलिस कोठडी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या वैभव देवरेच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला ४ लाख रुपये व्याजाने देत तब्बल २८ लाखांचे व्याज बळजबरीने वसूल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन दिवसांतच देवरेच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून देवरेला गुरुवारपर्यंत (दि. १८) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवरे याने व्याजाकरिता धमकी, शिवीगाळ आणि अधिक व्याज घेतले असल्यास पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

नवीन सोनवणे (रा. कमोदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित वैभव यादवराव देवरे (रा. राजीवनगर इंदिरानगर) याच्याकडून २०२१ मध्ये ४ लाख रुपये व्याजाने घेतले होते. संशयित देवरे याने व्याजाच्या रक्कमेकरिता शिवीगाळ, दमदाटी करत बळजबरीने सोनवणे यांच्या वडिलांच्या बँक खात्यातून ९ लाखांची रक्कम काढून घेतली. वेळोवेळी बळजबरीने व्याजापोटी २८ लाखांची रक्कम घेतली, व्याजाची मागणी सुरुच असल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

दोन दिवसांपूर्वी एका महिलेने व्याज थकवल्याने संशयित देवरे याने दोन कार बळजबरीने नेल्या होत्या. महिलेने पैसे देण्याची तयारी दर्शवली तरी देखील संशयिताने महिलेला अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला. आठ दिवसांपूर्वी देवरेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात पोलिसांनी देवरेला अटक केली होती.

राजकीय पदाचा गैरवापर:
संशयित देवरे हा एका राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी असताना त्याने पदाचा गैरवापर करत मित्र, नातेवाईक, व्यावसायिक यांना व्याजाने पैस दिले. कर्ज देताना सुरवातीलाच तीन महिन्यांचे व्याज कापून घेत पूर्ण रकमेवर व्याज वसूल करत होता. व्याज दिले नाही तर घरातील वस्तू, वाहने नेत होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790