नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरात गेल्या काही दिवसांपासून १०० व ५०० रुपयांच्या स्टॅम्पचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या प्रमाणात मुद्रांक विभागाकडून पुरवठा होत नसल्यामुळे संपूर्ण राज्यात ही परिस्थिती ओढावली आहे.
स्टॅम्पची मागणी नोंदवलेली असल्यामुळे येत्या २० तारखेपर्यंत शहरात सर्वत्र मुबलक प्रमाणात स्टॅम्प उपलब्ध होणार असल्याची माहिती अपर कोषागार अधिकारी श्वेतांबरी भोसले यांनी दिली.
स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाल्याने विविध शासकीय कार्यालयांशी निगडित प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्र, जात पडताळणी वंशावळ, साठेखत, भाडे करारनामा, नोटरी, ईसार पावती अशी विविध कामे रखडली आहेत. स्टॅम्प उपलब्ध असलेल्या मुद्रांक विक्रेत्यांकडे मोठ्या रांगा लागत आहेत, मुद्रांकाचा पुरवठा कमी प्रमाणात येत असल्याने ही परिस्थिती ओढावली असून नागरिकांची कामे खोळंबू नये म्हणून शहरातील प्रत्येक मुद्रांक विक्रेत्यांना ४०० ते ५०० मुद्रांक दिले जात आहेत.