Amazon

नाशिक: रविवारी मोफत नेत्रतपासणी शिबिर

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व गीताई ग्रुपच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १८) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिकनगर येथील रेणुका माता मंदिरात हे शिबिर घेण्यात येणार आहे. नेत्रतज्ञ डॉ. नानासाहेब खरे, डॉ. सुनिता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गीताई ग्रुपचे संचालक प्रवीण नागरे, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ भरीत यानी केले आहे,

Loading

🔎 हे वाचलं का?:  दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान! नाशिकमध्ये ३३६ जणांवर कारवाई
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790