
नाशिक। दि. ५ डिसेंबर २०२५: उज्जैनला झालेल्या ६९व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राला पहिले स्थान मिळवून देणाऱ्या संघात नाशिकच्या निकेतन श्रीराम शिंदे याने चमक दाखवली. देशभरातील एकूण १८ राज्यांनी सहभाग नोंदविलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत निकेतन याने उत्तुंग कामगिरी करत सांघिक सुवर्णपदक पटकावले.
महाराष्ट्र संघाने प्रभावी प्रदर्शन करत भारतात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला. विशेष म्हणजे, नाशिकमधून राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील गटात निवड होणारा निकेतन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. महाराष्ट्र संघात एकूण ४ खेळाडू निवडले असून, त्यात ३ मुंबईतील आणि नाशिकचा निकेतन शिंदे याचा समावेश होता.

निकेतन हा फ्रावशी अकॅडमीचा ६ वीतील विद्यार्थी असून, गत ४ वर्षांपासून यशवंत व्यायामशाळेत प्रशिक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबचे प्रशिक्षण घेत आहे. निकेतनच्या यशानंतर फ्रवशी अकॅडमीचे चेअरमन रतन लथ, यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी त्याचा सत्कार केला.
![]()


