नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आयफोनचे कंपनीच्या डुप्लिकेट ऍक्सेसरीज विक्री करणाऱ्या एम.जी. रोड वरील 4 दुकानांवर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एम.जी. रोड वरील प्रधान पार्क येथील 4 दुकानांमध्ये आयफोनचे कंपनीचे डुप्लिकेट ऍक्सेसरीज विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकला. तेव्हा रूपाराम जेठाराम चौधरी (वय 40), बाबूलाल नेथीराम चौधरी (वय 28), दिलीप ढोलाराम बिष्णोई (वय 26), कमलेशकुमार सुजाराम चौधरी (वय 23) यांनी कोणतेही स्वामित्व हक्कांचा कायदेशीर अधिकार नसताना उत्पादनाचे बनावटीकरण व साठेबाजी करून नफा मिळवण्यासाठी 3 लाख 86 हजार 530 रुपयांचा बनावट माल मिळून आला. याप्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक लाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार गणेश भामरे, भारत डंबाळे, पोलीस नाईक: विनायक आव्हाड, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, बी. व्ही. राऊत, विठ्ठल चव्हाण, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड व मंगल जगताप यांनी बजावली.