नाशिक: स्कूल व्हॅन-दुचाकीचा भीषण अपघात; सात विद्यार्थ्यांसह तिघे जखमी

नाशिक (प्रतिनिधी): पहिने बारी परिसरात स्कूल व्हॅन आणि पल्सर मोटर सायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत तर अन्य तिघे जबर जखमी झाले आहेत.

यात पल्सर या दुचाकी वाहनावरील जखमींचा समावेश आहे.

चिखलवाडी येथील शाळेच्या विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला हा अपघात झाला. अपघातातील जखमींना त्रंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.वरील सर्व जखमींवर त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉ. लोंढे डॉ राहुल येवले व सहकाऱ्यांनी यांनी उपचार केले.

तर दिलीप वारघडे 46 ,संदीप मेरांदे 25, रमेश आचारी 25 हे तिघे गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचार साठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्रंबकेश्वर रुग्णालयाकडून उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790