Amazon

नाशिक: सातपूर आयटीआयमध्ये लाखो रुपयांचा अपहार; तत्कालीन प्रभारी प्राचार्याविरुध्द गुन्हा दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तत्कालीन प्रभारी प्राचार्य संशयित सुभाष मारुती कदम, तत्कालीन यांनी शासन निधीचा गैर वापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन १९ लाख ५० हजार ६८२ रुपयाचा अपहार केल्याचे लाच लुचतप प्रतिबंध विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द म्हणुन सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महाध्वज ग्राम परिक्रमेला उत्साहात प्रारंभ; संत-महंतांसह हजारो भाविकांचा सहभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक येथे सन २०१७-२०१८ मध्ये आलोसे सुभाष मारुती कदम, तत्कालीन प्रभारी प्राचार्य असताना जेम्स पोर्टलवरुन खरेदी प्रक्रिया मध्ये अनियमितता दाखवून व तंत्र प्रदर्शन स्पर्धा नियमाप्रमाणे न भरविता मोठ्या प्रमाणात शासन निधीचा गैर वापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन रक्कम एकोणीस लाख पन्नास हजार सहाशे ब्यांएशी रुपये अपहार करून शासनाचे नुकसान केल्याचे उघड चौकशीत निष्पन्न झाले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ३०) नाशिकमध्ये भव्य नगरपरिक्रमा !

त्यानंतर सुभाष मारुती कदम, यांचेविरुध्द सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे १२ जून रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम १३(१) (अ) व भादवी कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२४ )

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790