नाशिक (प्रतिनिधी): प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेठ रोड नाशिक येथील कालबाह्य कागदपत्रे विक्री करावयाच्या अनुषंगाने अधिकृत रद्दी विक्रेत्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. इच्छुक निविदाधारकांनी बंद पाकिटात प्रति किलोप्रमाणे दर दि. 18 मार्च, 2025 रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत भांडार शाखा प्रादेशिक परिवहन कार्यालय पेठ रोड नाशिक यांच्याकडे सादर करावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
अटी व शर्ती:
इच्छुकांनी दरपत्रकासोबत वैध शॉप ॲक्ट परवाना, जी.एस.टी. क्रमांक नोंदणीप्रत व कोणत्याही शासकीय कार्यालयाचे कालबाह्य रद्दी खरेदी केल्याच्या आदेशाची प्रत सादर करावी. कार्यालयातील रद्दी स्वखर्चाने, आहे त्या स्थितीत उचलून घ्यावयाची आहे. तसेच सदर काम हाताळतांना कामगार व इतरांची संरक्षणाची सर्वस्वी जबाबदारी रद्दी खरेदीदाराची राहील. रद्दी विक्री केलेल्या पेपर्सची आपणास पुन्हा विक्री करता येणार नाही. खरेदी केलेल्या रद्दी पल्पिंग (लगदा) करण्यात यावा व ज्या ठिकाणी किंवा कारखान्यात लगदा करण्यात आला आहे त्या संस्थेचे/ कारखान्याचे प्रमाणपत्र व विक्री केल्याचे बिल प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील. जे पेपर्स रद्दीसाठी देण्यात येणार आहेत, त्या पेपर्सला स्मार्ट आरसी जोडलेली असल्यास ती पेपर्समधून वेगळी काढून कार्यालयास परत करण्याची जबाबदारी रद्दी खरेदीदाराची असणार आहे. रद्दीचे दर (प्रती किलो) देतांना पेपर व पुठ्ठा असे स्वतंत्रपणे देण्यात यावेत. रद्दी विक्री दर मंजूर झालेल्या पुरवठादारास प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नावाने रक्कम रुपये 50 हजार अनामत रक्कम धनादेशाद्वारे जमा करणे बंधनकारक आहे. निविदा स्वीकारण्याचे वा फेटाळण्याचे सर्व अंतिम अधिकार कार्यालय प्रमुख तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांना राहतील. निविदेतील अटी व शर्ती विहित कालावधीत पूर्ण कराव्या लागतील. परिस्थितीनुसार आवश्यक त्या नवीन अटी अंतर्भूत करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
19 मार्च, 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयात उघडण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी 0253-2229005 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.