नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार सोशल मीडिया पेजवरील कमेंटला प्रतिसाद दिला जात आहे. आता नागरिकांच्या सूचनांची तत्काळ दखल घेता यावी यासाठी 9923323311 या नंबरवर गुन्हेगारीच्या घटना, सूचना आणि अभिप्राय देण्याचे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवर नागरीकांच्या अनेक तक्रारी- सूचना प्राप्त होत आहेत. आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांना सूचना नोंदविण्याकरिता 9923323311 नंबर जाहिर केला आहे.
या नंबरवर संभाषणाची सुविधा नाही. आलेल्या तक्रारींची दखल घेत तत्काळ कारवाई केली जाणार आहे. पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवरही तक्रारीची सुविधा आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी ११२ क्रमांकाची हेल्पलाइन सुरूच राहणार असून या हेल्पलाइनवर नागरिकांना मदत मिळणार आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस पावले:
पोलिसांच्या सोशल मीडिया हँडलवर नागरीकांचा प्रतिसाद वाढत आहे. काही नागरीक सोशल मीडिया वापरत नाहीत. त्यांच्यासाठी तसेच शहरातील गुन्हेगारीला तत्काळ आळा बसावा यासाठी दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर नागरिकांनी तक्रार, गुन्हेगारीच्या घटना, सूचना करायच्या आहेत. या नंबरवर कॉल मात्र होणार नाही. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त