नाशिक। दि. २२ जानेवारी २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रामकाल पथ प्रकल्पांतर्गत महापालिकेकडून गोदाकाठावर विविध विकासकामे हाती घेतले जाणार आहे. ही विकासकामे ७० दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने पोलिसांच्या वाहतूक शाखेला कळविले आहे.
🚫 प्रवेश बंद मार्ग:
१) काळाराम मंदीराकडुन सिता गुंफा कडे जाणाऱ्या व येणाऱ्या दोन्ही बाजुचे मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
२) काळाराम मंदीर उत्तर, पुर्व व दक्षिण दरवाजा समोरील रोडवरून जाणाऱ्या व येणाऱ्या दोन्ही बाजुचे मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
⤴️ पर्यायी मार्ग:
१) श्री राम मंदीर – नाग चौक काटया मारुती चौकी गणेशवाडी गौरी पटांगण या मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे.
२) श्री राम मंदीर – नाग चौक – सितागुंफा रोड – सप्तश्रृंगी मंदीर या मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे.
🅿️ वाहनतळ (पार्किंग व्यवस्था):
गौरी पटांगण – येथे भाविक आपले वाहने पार्क करून सिता गुंफा व काळराम मंदिर येथे दर्शन व धार्मिक विधी करीता पायी जातील.
🚧 बॅरिकेटींग पॉईंट:
१) हॉटेल रामा पॅलेस व सितागुंफा समोर, २) ढिकले बंगल्या समोरील पार्किंग समोर, ३) काळाराम मंदीर उत्तर दरवाजा समोर, ४) काळाराम मंदीर दक्षिण दरवाजा समोर.
![]()


