नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वरला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा मंगळवारी (दि. ६) होणार आहे. या यात्रेनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतात व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात.
यात्रेकरिता लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये व भाविकांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाता यावे यासाठी सिटीलिंकच्या वतीने २७० बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
सिटीलिंककडून नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर व निमाणी ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर दैनंदिन २८ बसेसच्या एकूण १८० बसफेऱ्या चालविण्यात येतात. परंतु यात्रेदरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सिटीलिंकने तपोवन डेपोच्या ३ व नाशिकरोड डेपोच्या ११ अशा एकूण १४ जादा बसेसचे नियोजन केले असून या १४ बसेसच्या माध्यमातून एकूण ९० अतिरिक्त बसफेऱ्या करण्यात येणार आहेत.
६ व ७ फेब्रुवारी असे दोन दिवस या अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोनही दिवशी दैनंदिन २८ व अतिरिक्त ११ अशा एकूण ३९ बसेसच्या २७० बसफेऱ्या होणार आहेत.