नाशिक: तडीपार गुन्हेगाराकडून कट्टा हस्तगत, अटकेची कारवाई

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): तडीपार केलेल्या गुन्हेगाराला गावठी कट्टा बाळगताना अटक करण्यात आली. अश्विनी कॉलनी सामनगाव रोड येथे नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: तोतया पोलिसांचा मार्निंग वॉकला जाणाऱ्याला गंडा

मयूर अनिल जानराव (रा. भीमनगर) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिस कर्मचारी नाना पानसरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयिताला २ वर्षाकरिता शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

👉 हे ही वाचा:  आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या 'या' सूचना…

संशयित दुचाकीने सामनगावरोडवर येणार असल्याचे समजले. पथकाने संशयिताची दुचाकी थांबवून त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. संशयित सराईत गुन्हेगार असून घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे तपासात पुढे आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790