नाशिक (प्रतिनिधी): चांदवड येथील मुंबई आग्रा-महामार्गावरील मंगरूळ टोल नाक्यावर एका कर्मचा-याने पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिल्याचे समोर आले आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम टोल कर्मचारी साजरा करत असताना टोल क्रमांक तीनच्या लेन वर या कर्मचा-याने ही घोषणा दिल्या. ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत टोल व्यवस्थापक मनोज पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून देली. त्यानंतर तातडीने या कर्मचा-याला निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी घोषणा देणाऱ्या शेहबाज कुरेशी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटने बाबत आणखी साक्षीदार तपास केला जात असल्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे यांनी स्पष्ट केले. सर्व तपास झाल्यावर आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू असताना सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या दोघांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याची घटना घडली. एक दिवस आधी पुण्यात तिरंग्याचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर ही तिसरी घटना महाराष्ट्रात समोर आली आहे.