नाशिक: दोन फळ विक्रेत्यांवर आठ जणांकडून चॉपरने हल्ला; डोके व तोंडावर वार

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर- त्र्यंबकेश्वर रोडवरील श्रीराम चौकात ‘नो हॉकर्स झोन’ परिसरातील दोन फळ विक्रेत्यांवर आठ ते दहा हल्लेखोरांनी चॉपरने वार केल्याची घटना बुधवारी दिनांक 14 रोजी नऊ वाजेच्या दरम्यान घडली.

या हल्ल्यात फळ विक्रेते अखिल कुमार साहू व संतोष कुमार साहू (राहणार सातपूर कॉलनी) हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ  खाजगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात २० जूननंतर मान्सूनची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता

फळ विक्रेते अखिलकुमार साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान दुकान बंद करण्याच्या वेळेस सात ते दहा तरुणांनी येत अखिल कुमार साहू व  संतोष कुमार साहू यांच्या तोंडावर व डोक्यावर काही कळायच्या आत चॉपरने वार केले.

तसेच त्यांनी फळांची गाडी देखील पलटी करून साहित्याचं नुकसान केले. अचानक झालेल्या हल्ल्याने भेदरलेल्या साहू बंधूने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे फळ विक्रेते लगेच धावून आल्याने हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थापूर्वी निर्माल्य व्यवस्थापनासाठी मंदिर संस्थानांना एकत्र आणणार कुंभमेळा प्राधिकरण

या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले .या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790