NC

नाशिक: नवज्योती महिला मंडळातर्फे विवाहित महिलांसाठी ८ रोजी समूहनृत्य स्पर्धा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरूळ येथील नवज्योती महिला मंडळातर्फे विवाहित महिलांसाठी ८ फेब्रुवारीला समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कालिदास कलामंदिरात ही स्पर्धा रंगणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 मार्च रोजी विशेष मोहीमेचे आयोजन

नवज्योती महिला मंडळाच्या वतीने महिलांच्या कलागुणांना बाव देण्यासाठी सात वर्षांपासून विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यात सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक शैक्षणिक, कार्यक्रमांचा समावेश आहे. दररोजच्या कौटुंबिक व्यापात विवाहित महिलांचे आपल्या कलागुणांकडे दुर्लक्ष होते.

रोजच्या व्यापातून त्यांना थोडासा विरंगुळा मिळावा या उद्देशाने हे उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी मंडळाने विवाहित महिलांसाठी समूहनृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून संकलित होणारा निधी सामाजिक कार्यासाठी देणगी म्हणून दिला जाणार आहे. या उपक्रमासाठी मंडळाच्या अध्यक्षा दक्षणा औटी आणि माजी अध्यक्षा स्वाती माडीवाले व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790