नाशिक: महापालिका आयुक्तपदी राहुल कर्डिले !

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या अनेक दिवसांपासून बदली म्हणून होणार चर्चेत असलेले आणि भूसंपादन प्रकरणात वादग्रस्त राहिलेले महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची अखेर बदली झाली असून, शासनाने वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरणाचा विसर्ग ८,१६० क्युसेकवर; बुधवारपासून तीन दिवस ‘यलो अलर्ट’

नाशिकला पुढील दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा असून, विकास आराखडा आणि कामांना गती मिळावी, म्हणून थेट आयएस आयुक्त मिळावे, अशी मागणी होती. कर्डिले हे थेट आयएएस असून, शासनाने त्यांची नियुक्ती करत एक प्रकारे कुंभमेळा नियोजन हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे निश्चित केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790