नाशिक। दि. १३ जून २०२५: आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवून हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘डिजिलॉकर’ या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली आहेत. वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल
वीजबिल भरण्यासाठी तसेच हे बिल कुठे पाठविण्यास किंवा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. फोनमध्ये डिजिलॉकर अॅपमध्ये महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच विजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. आपल्या महावितरणने संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहक आपल्या डिजिलॉकर अॅपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल, असे महावितरणच्या सूत्रांनी कळविले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790