नाशिक शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. ११ जुलै) वीजपुरवठा बंद राहणार…

नाशिक। दि. १० जुलै २०२६: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने द्वारका चौक परिसरात अंडरपास रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांच्या महत्वाच्या कामानिमित्त नाशिक शहरामधील द्वारका १ कक्ष अंतर्गत सारडा व गोदावरी वाहिनी वर असलेल्या काही भागातील वीज पुरवठा शनिवारी दि ११ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत 10 ते 12 जुलै रोजी विशेष शिबिरांचे आयोजन

खालील काही भागातील वीज पुरवठा बंद असेल
यामध्ये बागवान पुरा, द्वारका सर्कल, वडाळा नाका, कपूर मार्केट, मोठा राजवाडा, चौक मंडई, चित्रकूट, कावेरी हॉटेल एरिया, बेले लेन, रेणुका नगर, आझाद चौक, सैनी हाऊस व परिसर यांचा समावेश असेल.

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ यांच्याकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790