नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२५: महावितरणच्या १३२ केव्ही टाकळी विद्युत उपकेंद्रातील ३३ केव्ही गोविंदनगर या वाहिनीवर केबल जोडण्यासाठी तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी (दि. १५) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत इंदिरानगर भागातील शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रातील वाहिनीवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
शिवाजीवाडी या उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वाहिन्यांवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये दीपालीनगर, शनी मंदिर, कल्पतरूनगर, भारतनगर, भाभानगर व क्युरी मानवता तसेच गोविंदनगर विद्युत उपकेंद्रातील ११ केव्ही कालिका वाहिनी याचा समावेश असेल.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790