नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये मान्सून सोमवारी (दि.१०) दाखल झाला असून नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेच्या अनुकूल वाटचालीमुळे त्याने वेळेत हजेरी लावली आहे.
दरम्यान, बंगालची उपसागरीय शाखा अजूनही जागेवरच असल्याने विदर्भ आणि उर्वरित मराठवाड्यात मान्सून दाखल होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
चक्रीय वाऱ्यांची स्थिती मोसमी पावसास पूरक:
मराठवाडा परिसरात ९०० मीटर उंचीपर्यंत वाऱ्यांची स्थिती मान्सून व त्याच्या प्रगतीसाठी पूरक असल्याने मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी पाऊस पडण्यास पूरक ठरणार आहे.
मध्यम ते जोरदार:
नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हार व सोलापूर या जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत (दि. १३) मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
आतापर्यंत मान्सून राज्यात येथे दाखल: कोकण, मध्य महाराष्ट्रासह मुंबई, डहाणू, ठाणे, नगर, बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर.