नशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरामधील पेठरोडनजिक असलेल्या राहू हॉटेल जवळ शुक्रवारी (दि.२०) संध्याकाळच्या सुमारास सुगंधीत तंबाखूची अवैद्यपणे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला (एमएच १० एक्यु ६१४०) म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाका बंदीवर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना या ट्रकवर संशय आल्याने हा ट्रक अडवला. ट्रकची झडती घेतली असता त्यात सुगंधित तंबाखूच्या गोण्या आढळून आल्या आहेत.
ट्रक चालकाची चौकशी केल्यानंतर चालकाने सागितले की हा ट्रक गुजरात वरून हैदराबाद ला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रकला अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकमध्ये चार हजर किलो सुगंधित तंबाखू असून त्याची किंमत सुमारे एकोणतीस लाख पन्नास हजर आहे असे सांगितले. तरी हा माल नाशिकमध्येच आणल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790