नाशिक: एप्रिलमध्ये घरपट्टी भरल्यास ८ तर मेमध्ये ६ टक्के सवलत

नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या विविध कर विभागाने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात कर सवलत योजना जाहीर केली आहे. एप्रिलमध्ये संपूर्ण कर भरल्यास ८, मेमध्ये ६ तर, जूनमध्ये कर भरल्यास ३ टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच ऑनलाइन कर भरल्यास संबंधित मिळकतीच्या सर्वसाधारण कराच्या पाच टक्के अतिरिक्त सवलतीचा लाभ दिला जाणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेला घरपट्टी वसुलीमध्ये अडचणी येत असल्याने ५०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. दरवर्षी थकबाकी वसूल करण्यासाठी करसवलत, अभय योजनेसारख्या योजना राबवल्या जातात. गेल्यावेळी देखील १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत योजना लागू झाल्यानंतर १०० कोटीपेक्षा अधिक महसूल मिळाला होता. त्यानंतर थकबाकी वसुलीसाठी अखेरच्या टप्यामध्ये अभय योजना लागू केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून २५६ कोटी रुपयांची वसुली झाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

गेल्या वर्षी २.३६ लाख मिळकतधारकांना लाभ: नियमित घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांसाठी पालिकेने गेल्या वर्षी १ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीत राबविलेल्या त्रैमासिक सवलत योजनेचा २ लाख ३६ हजार ३९६ मिळकतधारकांनी लाभ घेतला होता. एप्रिल महिन्यात सर्वाधिक १ लाख ४७ हजार २४३ मिळकतधारकांनी ५७ कोटी ९५ लाख रुपये, दुसऱ्या टप्यात मे महिन्यात ५९ हजार ३८२ मिळकतधारकांनी २६ कोटी ८९ लाख रुपये तर तिसऱ्या व शेवटच्या टप्यात जून महिन्यात तब्बल २९७७१ मिळकतधारकांनी १५ कोटी ४१ लाखांची घरपट्टी भरली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here