नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ज्या इमारतींना घरपट्टी नाही त्यांना विजेचा वापर सुरू असलेल्या दिनांकापासून घरपट्टी आकारणी केली जात आहे. तसेच करविभाग आणि नगररचना विभागाला लिंक करत, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळताच, आता घरपट्टी लागू होत आहे. त्यामुळे एप्रील २०२३ ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात २४ हजार ९९३ मिळकती या करकक्षेत आल्या आहेत.
पंधरावा वित्त आयोगाच्या अटीनुसार महापालिकेला किमान २४ टक्के उत्पन्नामध्ये वाढ करणे अपेक्षित असून एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत कर विभागाने शहरातील २४ हजार ९९३ नागरिकांचे मिळकतींना घरपट्टी रेकॉर्डवर आणले आहे. अर्थात त्यामुळे महापालिकेलाही फायदा झाला असून ४४ कोटी २५ लाखांची उत्पन्नात भर पडणार आहे.
महापालिकेच्या विविध कर विभागाने उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वापर सुरू असलेल्या मिळकतींना घरपट्टी रेकॉर्डवर आणले जात आहे. त्यासाठी महावितरणची देखील मदत घेतली जात आहे.
पालिकेच्या रेकॉर्डवर आता ५,१3,000 मिळकती:
पालिकेच्या स्थापनेनंतर अर्थातच १९८२ ते २०१६ पर्यंत मागील ३४ वर्षात जेमतेम तीन लाख मिळकती रेकॉर्डवर होत्या. त्यानंतर सन २०१७ ते मार्च २०२३ पर्यंत यात एक लाख ८८ हजार मिळकतींची भर पडली. त्यामुळे हा आकडा चार लाख ८८ लाखांपर्यंत पोहचला होता. आता या नऊ महिन्यांत २५ हजार मिळकतींची भर पडल्यामुळे हा आकडा आता पाच लाख १३ हजार पर्यंत पोहोचला आहे.