मुंबई। दि. २१ जानेवारी २०२६: लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी माहिती ही एक्स या समाज माध्यमावर दिली.
त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे “महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.
तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.”
या बाबी तपासणार:
लाभार्थी महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे, लाभार्थी पात्र महिलाच असावी, लाभार्थी महिलेचा पती सरकारी कर्मचारी नसावा, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
![]()


