स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा यशस्वितेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक (प्रतिनिधी): मागील कुंभमेळ्याच्या धर्तीवर 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असून ही एक सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्यातून यशस्विपणे पार पाडू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण, पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 बैठकीत ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, उपजिल्हाधिकारी (कुंभमेळा) रवींद्र भारदे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज, महंत रामनारायणदास महाराज, कपिलधारा कावनई, महंत कृष्णचरदास महाराज, महंत राजारामदास महाराज, महंत भगवानदास महाराज, महंत नरसिंगाचार्य महाराज, महंत बालकदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची व सहकार्याची आवश्यकता आहे. प्रयागराज येथे झालेला कुंभमेळ्यातील भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर येथेही मागील कुंभमेळाच्या तुलनेत 3 ते 4 पट अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यावेळी पावसाळ्याचा कालावाधी असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षितेचे अधिक काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. कुंभ पर्वणी काळात महंत व भाविकांच्या स्नासासाठी नदीपात्रातील पाणी स्वच्छ व वाहते ठेवण्याच्या दृष्टीने पर्यायी पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

सिंहस्थ कुंभमेळासाठी योग्य नियोजन व सुविधांसाठी आवश्यक जमिनी कायमस्वरूपी संपादित केल्या जातील. साधू-महंत यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असेही जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

यावेळी महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, रामसनेहीदास महाराज, राघवदास महाराज, सतीश शुक्ल यांच्यासह महंतांनी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने विविध सूचना मांडल्या.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीसाठी आलेल्या सर्व महंतांचे स्वागत केले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here