नाशिक: जिल्ह्यात खासगी जमिनीचे तात्पुरते अधिग्रहणासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त

नाशिक। दि. २६ नोव्हेंबर २०२५: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक खासगी जमिनीचे तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहणासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी निर्गमित केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी आदेशात म्हटले आहे की, सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान जिल्ह्यात सार्वजनिक सुरक्षा, वाहतूक, आरोग्य, निवास व मूलभूत सोयीसुविधांसाठी काही खासगी जमिनींचा तात्पुरता अथवा अर्ध-स्थायी ताबा घेण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीमध्ये हा अत्यंत महत्वाचा घटक असून याबाबतचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नियमितपणे घेत असतात.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: खंडणीच्या गुन्ह्यात ९ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितास अटक !

या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा महाराष्ट्र भूमी अधिग्रहण नियमान्वये अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे व कार्यक्षेत्र असे (अनुक्रमे पदनाम व कार्यक्षेत्र या क्रमाने) : उपविभागीय अधिकारी, नाशिक (नाशिक शहर व ग्रामीण भाग), उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर (इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुका), उपविभागीय अधिकारी, निफाड (निफाड व सिन्नर तालुका), उपविभागीय अधिकारी, दिंडोरी (दिंडोरी व पेठ तालुका), उपविभागीय अधिकारी, येवला (येवला व नांदगाव तालुका), उपविभागीय अधिकारी, कळवण (कळवण व सुरगाणा तालुका), उपविभागीय अधिकारी, चांदवड (चांदवड व देवळा तालुका), उपविभागीय अधिकारी, मालेगाव (मालेगाव शहर व ग्रामीण), उपविभागीय अधिकारी, बागलाण (बागलाण तालुका). संबंधित भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांची मदत घेऊन त्यांच्या क्षेत्रात अधिग्रहणाचे कामकाज पूर्ण करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here