Live Updates: Operation Sindoor

नाशिक कुंभमेळा २०२७ साठी महत्त्वपूर्ण स्थळांची पाहणी; विकास आणि नियोजनास मिळणार गती

नाशिक (प्रतिनिधी): आगामी कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त समन्वयाने पंचवटी विभागातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.  जिल्हाधिकारी जलज शर्मा  व नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री  यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कुंभमेळ्यासंदर्भातील आवश्यक बाबींचा आढावा घेतला.

पाहणी दरम्यान महत्त्वाच्या विकासकामांचा समावेशासह योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ठोस कार्यवाहीचे  तसेच कुंभमेळा २०२७ साठी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी तत्काळ नियोजन व कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

👉 हे ही वाचा:  नाशिक शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: ८० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती; ४२ ताब्यात

⚡अशी आहेत महत्वाची विकासकामे:
👉 साधूग्राम ते रामकुंड अमृत मिरवणूक मार्ग व परतीचा मार्ग
👉 काँक्रीट रस्त्यांचे नूतनीकरण व रुंदीकरण
👉 रस्त्यालगत पौराणिक व रामायणकालीन भित्तीचित्रे रंगवून सुशोभीकरण
👉 अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे हटविणे

⚡ भाजी मार्केट पुनर्विकास व स्थलांतर
👉 नदीघाट परिसरातील भाजीबाजाराचे स्थलांतर
👉 गाडगे महाराज पुलालगत अमृत मिरवणुकीसाठी डाऊन रॅम्प बांधणी

👉 वाघाडी नदी सुशोभीकरण व प्रवाह नियोजन
👉 नदीतील सांडपाणी प्रवाह अडविणे व वळविणे
👉 वाघाडी नदीच्या काठावर व्ह्यू कटर भिंत आणि पर्यावरणपूरक सुशोभीकरण

👉 हे ही वाचा:  नाशिक: दोन दुचाकीचोर सात दुचाकींसह जाळ्यात

👉 नदीकाठचा भाविक शाही मार्ग आणि पादचारी पूल
👉 टाळकुटेश्वर पुलाजवळ सांडवा पूल बांधणी
👉 रामकाल पथ अंतर्गत संपादन करावयाच्या ठिकाणांची पाहणी
👉 वाहतूक आणि पूल सुधारणा
👉 भिकूसा पेपर मिल येथील नवीन पूल सुरू करण्यासाठी MSEB खांब स्थलांतर
👉 NIT कॉलेज ते हिरावाडी रोड पूलासाठी मिसिंग लिंक संपादन

👉 भाविक ग्राम, तात्पुरती निवास व्यवस्था आणि सांस्कृतिक कार्यक्रम
👉 मिनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी नाट्यगृह, महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांसाठी एकत्र क्लस्टर तयार करून भाविक ग्राम व टेंट सिटी उभारणी
👉 कुंभमेळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रामकथा स्टेज शो, डिजिटल म्युझियम यांचा समावेश

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

👉 वाहतूक व पार्किंग नियोजन
👉 अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी ई-रिक्षा व मोटारसायकल सेवा
👉 पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे वाहनतळ विकसित करणे

👉 आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा उपाययोजना
👉 संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे
👉 गर्दी नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा व सुरक्षा उपाय

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790