NC

मुंबई – आग्रा महामार्गावर जुन्या कसारा घाटात बर्निंग कारचा थरार…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई – आग्रा महामार्गावर शुक्रवारी दुपारी जुन्या कसारा घाटात कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. मुंबईहून नाशिकच्या दिशेने ही कार येत असताना जुना कसारा घाटात घाट चढून आल्यावर या कारने पेट घेतला. महिंद्रा कंपनीची XUV कार ही होती. या कारचा नंबर एमएच ०४ एचएफ ३६४१ असा आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

शॅार्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करुन गाडीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली. पण, कार जळून खाक झाली.

या घटनेमुळे जुना कसारा घाटातील वाहतुक एक तासापासून बंद करुन नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलिस केंद्र घोटी, इगतपुरी नगरपरिषदेचे अग्निशमन दल, टोल नाक्याचे अग्निशमन दल, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली. यानंतर या घाटातून वाहतुक सुरळीत सुरु झाली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790