जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
अनेक शहरांत जाळे असलेल्या रोलेट जुगारातील मुख्य संशयित कैलास शहा यास ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे.नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका शेतकऱ्याने रोलेटमध्ये पैसे हरल्याने कर्जबाजरी होऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानुसार प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी कैलास शहाला अटक केली आहे..
रोलेट या ऑनलाइन app वर खेळून कर्जबाजारी झालेल्या त्र्यंबकेश्वर येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती,त्याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात या गेमिंग एपच्या माध्यमातुन करोडोंची संपत्ती जमवलेल्या कैलास शहाला त्रंबकेश्वर पोलीसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन पोलीसांना चकवा देत रोलेट सारख्या जुगाराच्या माध्यमातुन लाखो तरुणांना या जाळ्यात ओढणारा कैलास शहाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
आधी कॉम्पुटरच्या माध्यमातून तर आता घरोघरी सर्वांकडे उपलब्ध असलेल्या mobile लक्षात घेत, app अवगत करून अनेकांना रोलेटच्या जुगारात अडकवले जात आहे. त्या माध्यमातून मिळणारा पैसा आणी त्यामुळं व्यसन लागल्याच्या अनेक तक्रारींची राज्यात नोंद झाल्याचं,पोलिसांचं म्हणणं आहे. याचा खुलासा स्वत: पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणात अजून अनेक बडे धागे दोरे हाती लागणार असल्याचे संकेत मिळताय. खरं तर रोलेट या ऑनलाइन खेळाला सरकारी परवानगी आहे की नाही ? याबद्दल शासनपातळीवरच संभ्रमाचं वातावरण आहे. रोलेटच्या माध्यमातुन चालवला जाणारा हा गोरख धंदा संपुर्ण राज्यभर पसरला आहे.
आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल या गेमिंग एपच्या माध्यमातुन झाली असली तरी कैलास शहाच्या अटकेनंतर ही संपुर्ण साखळीच आता समोर येणार आहे. त्यामुळे अश्या गेमिंग एपच्या माध्यमातुन तरुण पिढीला जुगाराच्या या काळ्या जाळ्यात ओढणा-या कैलास शहाची अटक ही एक सुरुवात असल्याचं बोललं जातंय. तर अश्या प्रकारापासून तरुणांनी तसेच ग्रामीण भागातील लोकांनी लांब राहून आपला कष्टाचा पैसा अश्या गोष्टींवर वाया घालू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.