HomeAd

नाशिक: ‘इसिस’ला फंडिंग करणाऱ्या हुजेफच्या साथीदारांचा शोध !

वाढीव पोलिस कोठडीचा अधिकार राखीव: कारागृहात रवानगी

नाशिक (प्रतिनिधी): दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरातील तिडके कॉलनीमधून अटक केलेला इंजिनीअर असलेला आरोपी हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.५) न्यायालयीन कोठडी सुनावली.

त्याची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने एटीएस पथकाने त्यास न्यायालयात हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी हुजेफची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच्या साथीदारांचा एटीएसकडून आता शोध सुरू आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कन्यादान योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन
👉 हे ही वाचा:  नाशिक: दहा हजारांची लाच स्वीकारतांना ग्राम महसूल अधिकाऱ्याला अटक

मागील आठवड्यात एटीएसच्या पथकाने संशयित हुजेफ यास तिडके कॉलनीमधून अटक केली होती. त्यास न्यायालयाने आतापर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली. पोलिस कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने न्यायालयाने त्यास येत्या २० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

यावेळी दहशतवादविरोधी पथकाच्या तपासी अधिकारी यांनी १६, दिवसांच्या पोलिस कोठडीचा अधिकार राखीव ठेवला आहे. या सुनावणीप्रसंगी न्यायालयात सरकार पक्षाकडून विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर हे उपस्थित होते.

👉 हे ही वाचा:  सहा महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधून अटक

दरम्यान, हुजेफ याचा मनी ट्रेल, दुबईमार्गे हवालाचा ट्रेल न्यायालयापुढे मांडण्यात आला आहे. त्याच्या उर्वरित साथीदारांचा एटीएसकडून शोध सुरू आहे. जेव्हा, त्याचे साथीदार हाती लागतील तेव्हा, पुन्हा गरज भासल्यास हुजेफ याची पोलिस कोठडीची मागणी एटीएसकडून न्यायालयाकडे केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790