नाशिक (प्रतिनिधी): राज्यात गेल्या पाच दिवसांपासून निर्माण झालेले पावसासाठी अनुकूल वातावरण आता निवळत आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यामुळे यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि विदर्भात २५ ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज नागपूर आणि पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
आज (दि. २४) मात्र ठिकठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या सर्व भागांसाठी नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला होता. मात्र उद्यापासून (दि. १५) वातावरण निवळेल, असे आता स्पष्ट करण्यात आले आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्यांचा वेगही कमी होऊन तो २० ते २५ किलोमीटर प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे.
![]()

