नाशिक: लाकडी भुशाच्या गोण्यातून १८ लाखांचे अवैध मद्य जप्त

नाशिक (प्रतिनिधी): वाहनात लाकडी भुशाच्या गोण्यांत मद्याच्या बाटल्या लपवून अवैध मद्य तस्करी करणाऱ्या वाहनातून १८ लाख ६० हजारांचा मद्यसाठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने महामार्गावरील दहावा मैल, ओझर शिवारात ही कारवाई केली. याप्रकरणी पिकअपचालकाला ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, भरारी पथक १ महामार्गावर गस्त करत असताना एमएच १५ जेसी ४९६६ या क्रमांकाच्या पिकअप वाहनाला थांबण्याचा इशारा दिला. वाहनचालकाने चकवा देत वाहन वेगात पुढे नेले. पथकाला संशय आला. पाठलाग करत वाहन थांबवले असता पिकअपच्या ट्रॉलीत गोण्यात भुसा भरलेला आढळून आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

गोण्या कापून पाहिले असता त्याच दिव आणि दमण राज्यात निर्मित मद्यसाठा मिळून आला. चालक परवेझ खान (रा. बलसाड, गुजरात) यास ताब्यात घेतले. गोण्यांतून १०५ बॉक्स जप्त केले. अधीक्षक शशिकांत गर्जे, गणेश नागरगोजे, रोहित केरीपाळे, पी. वाय. गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790