महत्वाची बातमी: सप्तशृंगी गडावर जाणारा घाट ‘हे’ 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश !

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ मानलं जाणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगगड देवी भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

उद्यापासून चार दिवस सप्तशृंगी घाट भाविकांसाठी बंद राहणार आहे. 23 ते 26 सप्टेंबरपर्यंत 4 दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

भाविकांच्या सुरक्षेसाठी घाटात दरड प्रतिबंधक जाळी बसविण्याचे काम पर्यटन तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्यात येत असून हे काम सध्या सुरू असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी अनुकुरी नरेश यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790