नाशिक जिल्ह्यात खरोखरंच दोन दिवस वीजपुरवठा बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सलग दोन दिवस वीजपुरवठा बंद राहणार असल्याची जाहिरात नाशिकमध्ये सोशल मीडियावर फिरते आहे. याबाबत महापारेषण कंपनीने सुधारित वृत्त दिले आहे.

काही अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीच्या कामाकरिता नाशिक जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांना विद्युत पुरवठा करत असलेल्या २२० के.व्ही. व बाभळेश्वर-एकलहरे (नाशिक) या दोन्ही वाहिन्या बंद करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:  खळबळजनक! पंचवटीतील तरुणाचा हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला

तथापि सदर काळात पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता विद्युत निर्मिती विभाग एकलहरे व नाशिक नवसारी वीजवाहिनीद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि, सदर पर्यायी व्यवस्थेमध्ये काही आकस्मिक तांत्रिक बिघाड झाल्यास आणि गरज पडल्यास खालील उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांत अंशतः वीज पुरवठा बंद राहू शकतो. दिलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण न झाल्यास वीज पुरवठा सुरु करण्यास विलंब होऊ शकतो असे कळविण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

नाशिक जिल्हा अंतर्गत वीज पुरवठा बंद होऊ शकणारा भाग:
१३२ के. व्ही. ओझर, आडगाव, म्हसरूळ, सिन्नर व अंबड, रा’पिंपळस टाकळी या उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केल्या जाणाऱ्या ३३ के. व्ही. वाहिन्यांचा अंशतः वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.

तारीख, वार व वेळ:

शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३: वेळ: सकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत

हे ही वाचा:  नाशिक: हायवेला ढाब्यांवर दारू रिचविणाऱ्यांची आता काही खैर नाही !

रविवार दि. १० सप्टेंबर २०२३: वेळ: सकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790