नाशिक: लाचखोर झाले हाय टेक; चक्क फोन पे वरून स्वीकारली लाच

नाशिक (प्रतिनिधी):  7 हजार रुपयांची लाच घेताना विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबनधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यासिन नासर अरब (वय 42) असे अहमदनगर तालुक्यातील लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी 2016 मध्ये भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मर्या. केडगाव, अहमदनगर येथून 5,00,000 कर्ज घेतले होते. हे कर्ज घेते वेळी तक्रारदार यांनी त्यांच्या आई व मामाच्या नावे असलेली त्यांची भोरवाडी, ता. नगर शिवारातील शेत गट नं 499 मधील 1 हे.30 आर क्षेत्र जमीन तारण म्हणून दिली होती. तक्रारदार यांना पतसंस्थे कडून सदर कर्जफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत देण्यात आलेली होती. परंतु तक्रारदार मुदतीत कर्ज फेड करू शकले नाही.

त्यामुळे या वसुली बाबत भैरवनाथ पतसंस्थेने सहायक निंबधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन कडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार ही वसुली करण्यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन ने दि.25 मे 2023 रोजी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीस तक्रारदार यांना हजर राहणे बाबत ची नोटीस प्राप्त होती. त्यानुसार तक्रारदार पण त्या ठिकाणी हजर होते.

हे ही वाचा:  नाशिक: हायवेला ढाब्यांवर दारू रिचविणाऱ्यांची आता काही खैर नाही !

त्यादिवशी तक्रारदार यांनी फेडरेशनचे वसुली अधिकारी यासिन अरब यांना कर्ज फेड करण्यासाठी 2 महिन्याची मुदत मागितली होती. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना तोंडी दोन महिन्याची मुदत वाढ दिली होती.

त्यानंतर कर्ज फेड मुदतवाढीसाठी फी म्हणून दि.23 ऑगस्ट 2023 रोजी 1000 रुपये फी मागितली असता तक्रारदार यांनी त्याच्या फोन पे ला 1000 रुपये फोन पे केले. त्याबाबत तक्रारदार यांना कोणतीही शासकीय पावती दिली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.31/08/2023 रोजी भैरवनाथ पतसंस्थेचे सर्व कर्ज फेड केले तसा पतसंस्थेने कर्ज निल दाखला तक्रारदार यांना दिला होता.

हे ही वाचा:  खळबळजनक! पंचवटीतील तरुणाचा हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला

त्यानंतर दिनांक 04/09/2023 ते 07/09/2023 दरम्यान अरब यांनी तक्रारदार यांना वारंवार मोबाईल कॉल करून मी तुला कर्ज फेड करण्यास मुदत दिली. तुझ्या जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही. लिलाव होऊ दिला नाही तुला मदत केल्याच्या मोबदल्यात तू मला 30,000 रुपये दे, अशी लाच मागितली. याबाबतची तक्रार दि.07/09/2023 रोजी ला. प्र.वि. कार्यालय, अहमदनगर येथे तक्रारदार यांनी दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष दि. 7 व दि.8 सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता अरब यांनी तक्रारदार यांचे कडे 30,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपये लाच मागणी करून पहिला हप्ता म्हणून 7000 रुपये लाच रक्कम प्रथम स्वीकारण्याचे व पुढील दोन दिवसानंतर 13000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले, त्यानुसार दि.8/9/2023 रोजी सापळा रचण्यात आला असता अरब यांनी तक्रारदार यांचेकडून नगद स्वरूपात लाच स्वीकारली नाही, त्यांनी सदर लाच रक्कम फोन पे वर सेंड करण्यास सांगितले होते. आज दि.15/9/2023 रोजी अरब हे कार्यालयात हजर असताना सदर ची सापळा कारवाई आयोजित करून तक्रारदार यांचे फोन पे वरून 7000 लाच रक्कम अरब यांचे फोन पे वर सेंड केली. ही लाच घेताना अरब यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

कोतवाली पोलीस स्टेशन,अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अंमलदार,रमेश चौधरी, रविंद्र निमसे, सचिन सुद्रुक,वैभव पांढरे बाबासाहेब कराड, चालक पो हे कॉ. हरुन शेख,चालक पो.हे.कॉ. दशरथ लाड यांनी केली आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790