
नाशिक (प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे येथे ११ मार्चला उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळा तसेच आयएमडी (इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट) ने वर्तवला असून यलो अलर्ट जाहीर केला आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्रात अद्याप उत्तरेकडून ताशी १ ते २ किलोमीटर वेगाने गार वारे वाहत असल्याने वातावरणात काही प्रमाणात गारवा आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी किमान तापमान १२.४ तर कमाल ३४.९ अंशावर होते.
होळीला महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह ९ राज्यांत उष्णतेची लाट:
९ मार्चपासून होळीपर्यंत एकामागून एक पश्चिमी विक्षोभ येतील. यामुळे हवामान बदलेल. आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन यांच्या मते, पश्चिमी विक्षोभामुळे ९ ते १५-१६ मार्चदरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात वादळाची व पावसाची शक्यता आहे. हिमवृष्टी होईल. १० मार्चपासून दक्षिण भारतात हवामान बदलेल. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे., महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात तापमानात वाढ होईल.
⚡ हवामान कुठे आणि कसे बदलेल ?
👉 महाराष्ट्रः आता उत्तरेऐवजी पूर्वेकडून वारे वाहू लागतील. यामुळे पुढील तीन-चार दिवसांत खूप उष्णता जाणवेल. ते खूप उष्ण असेल. १०-११ मार्च रोजी मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येऊ शकते.
👉 गुजरातः मान्सूनपूर्व उष्णता तीव्र होईल. ८ मार्चपासून तापमान ४० अंशांपुढे जाईल. काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते.
👉 दिल्लीः ७ मार्चपासून दिवसाचे तापमान ३० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ११-१४ मार्चदरम्यान ते ३३ अंशांच्या पुढे जाऊ शकते. होळीच्या दिवशी पाऊस शक्य.
👉 उत्तर प्रदेशः संपूर्ण राज्यात तापमान वाढेल. १३ आणि १४ मार्च रोजी वायव्य जिल्ह्यांमध्ये पाऊस.
👉 बिहार-झारखंड: दोन्ही राज्यांमध्ये तापमान वाढू लागेल.
👉 मध्य प्रदेश-छत्तीसगडः वाढत्या तापमानामुळे उष्णता वाढेल. या राज्यांमध्येही रात्रीचे तापमान वाढेल आणि उष्णताही वाढेल.
![]()


