नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६५ हजार ६३५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५००, चांदवड ११९, सिन्नर ६३०, दिंडोरी २१५, निफाड ८३५, देवळा ९९, नांदगांव २४३, येवला ७२, त्र्यंबकेश्वर १२३, सुरगाणा २७, पेठ २५, कळवण ११०, बागलाण २३५, इगतपुरी १९०, मालेगांव ग्रामीण २७६ असे एकूण ३ हजार ७०० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ३६२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४७९ तर जिल्ह्याबाहेरील १०९ असे एकूण ७ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ७४ हजार ६३३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७९.०४, टक्के, नाशिक शहरात ९१.९२ टक्के, मालेगाव मध्ये ८३.०४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७१.८७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.९४ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४३४, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ७३४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५२ व जिल्हा बाहेरील २८ अशा एकूण १ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.