नाशिक जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ५ हजार २७६ ने घट

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख  ४० हजार ५१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २० हजार ६९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ५ हजार २७६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ६५८,  बागलाण ५८२, चांदवड ६३९, देवळा ६०८, दिंडोरी ८४५, इगतपुरी २१३, कळवण  ५११, मालेगाव ३४६, नांदगाव २९७, निफाड १ हजार ४२, पेठ ८४, सिन्नर १ हजार ६१, सुरगाणा २४५, त्र्यंबकेश्वर १६१, येवला १९५ असे एकूण ८ हजार ४८७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १० हजार ७३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३३८  तर जिल्ह्याबाहेरील १३५  असे एकूण २० हजार ६९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख ६४ हजार ७४८ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९२.२१ टक्के, नाशिक शहरात ९४.१९ टक्के, मालेगाव मध्ये  ८६.५५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.३९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १ हजार ९१७  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ७०९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २७९  व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. १४ मे सकाळी ११ वाजता प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790