जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७१० ने घट; ३५ हजार ९३२ रुग्णांवर उपचार सुरू !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ९८ हजार २८८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३५ हजार ९३२ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ७१० ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत २ हजार ७५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९९२, चांदवड १ हजार १४६, सिन्नर १ हजार १८४, दिंडोरी ८४८, निफाड २ हजार ५६२, देवळा १ हजार २२९, नांदगांव ७७२, येवला ४१३, त्र्यंबकेश्वर ४८९, सुरगाणा १९६, पेठ ११२, कळवण ६१५,  बागलाण १ हजार ३५९, इगतपुरी ५१५, मालेगांव ग्रामीण ९०२ असे एकूण १३ हजार ३३४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २० हजार ४४२ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८१६  तर जिल्ह्याबाहेरील ३४० असे एकूण ३५  हजार ९३२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २ लाख ३६ हजार ९७२ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८१.५८  टक्के, नाशिक शहरात ८५.०३ टक्के, मालेगाव मध्ये  ७९.४६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८६.९८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.६८  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १ हजार १६१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार २८१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२२  व जिल्हा बाहेरील ८८ अशा एकूण २ हजार ७५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790