नाशिक: धावत्या शिवशाही बसला भीषण आग; सुदैवाने जीवित हानी टळली

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

(दीपक श्रीवास्तव, नाशिक कॉलिंग प्रतिनिधी): निफाड तालुक्यातील चांदोरी जवळील शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर रविवार दि. 10  रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या  शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत बस मधील 25 प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शिंपीटाकळी फाटा येथे ही दुर्घटना घडली, शिवशाही बस क्रमांक एम एच ०९, एफ एल ०४७७ ही बस नाशिकहून छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना आज दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या बस मध्ये इंजिनच्या बाजूने  दूर निघत असल्याचे  चालकाच्या  लक्षात आले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

वाहकाने तत्काळ सदरची बस थांबून सतर्कतेने बस मधील प्रवासी खाली उतरून दिले, त्यानंतर काही क्षणातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला  व या आगीत ही संपूर्ण बस भक्षस्थानी पडली, सदरच्या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली, मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे,भाऊ कर्डिले किरण वाघ, सुरज पगारे,सचिन कांबळे, निलेश नाठे, गोकुळ टरले, घटनास्थळी उपस्थित होते

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

स्थानिक नागरिकांनी यावेळी आग  विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान या घटनेत  सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790