जिल्ह्यात आजपर्यंत 12 हजार 812 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 348 रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १२ हजार ८१२  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५४७ रुग्णांचा मृत्यू झाला असून  मृत्यू संख्येमध्ये आज घट झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक १२०, चांदवड ३५, सिन्नर १६२, दिंडोरी ६६, निफाड २०७, देवळा १२०,  नांदगांव ७४, येवला ०६, त्र्यंबकेश्वर २४, सुरगाणा १४, पेठ ००, कळवण ०२,  बागलाण ३०, इगतपुरी ३१, मालेगांव ग्रामीण ४४ असे एकूण  ९३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २४०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १६९  तर जिल्ह्याबाहेरील ०४  असे एकूण ४ हजार ३४८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १७  हजार ७०७  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७१.९२,  टक्के, नाशिक शहरात ७०.५० टक्के, मालेगाव मध्ये  ८२.०३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.४५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७२.३६ इतके आहे.

कोरोनामुळे आत्तापर्यंत झालले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १३०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ३११, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८६  व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ५४७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:  पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

(वरील आकडेवारी गुरुवार दि. ६ ऑगस्ट सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790