नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाकाळात अनेक विभागांची कामे खोळंबली असली तरी शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाजासाठी महत्त्वाची असलेले विविध दाखले वाटपात जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवत फेब्रुवारी 2020 ते जुलै 2020 या कालावधीत तब्बल 1 लाख 13 हजार 229 दाखले वितरीत केली आहेत. तर अवघ्या 13 हजार 882 दाखल्यांची अर्ज निकाली काढणे बाकी असून त्यांच्यातील त्रुटी दूर करुन प्रलंबित दाखल्यांचे जिल्ह्यात वितरण केले जाणार असलची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
दाखले वितरणाबाबत जिल्हा माहिती कार्यालयाला माहिती देत असतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, कोरोनामुळे ओढावलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक विभागातील कामकाज प्रभावित झाले. खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम सुरू झाले. सरकारी कार्यालयातही केवळ पाच टक्के उपस्थितीत कामकाज करण्यात आले. मात्र अशा परिस्थितीतही विविध दाखले वाटपाच्या कामकाजात गतिमानता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1 लाख 28 हजार प्रकरणामंध्ये अर्ज नाकरण्याचे प्रमाण फार कमी असून फक्त 926 अर्ज त्रुटी असल्यामुळे नाकारण्यात आले असल्याचेही श्री. मांढरे यानी सांगितले.
सर्वात जास्त उत्पन्न दाखल्याचे वितरण
नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न दाखल्याचे वितरण झाले आहे. 70 हजार 829 अर्जांपैकी 64 हजार 979 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 317 अर्ज नाकारण्यात आले असून 5 हजार 533 दाखले प्रलंबित असून त्यातील त्रुटी दूर करुन प्रलंबित प्रकरणेही लवकर निकाली काढली जाणार असल्याचे श्री. मांढरे यांनी सांगितले.
असे झाले दाखल्यांचे वितरण
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात एकूण 22 हजार 320 वय आणि राष्ट्रीयत्व व डोमिसाईल दाखल्यांपैकी 19 हजार 961 दाखल्यांचे वितरण करण्यात आले असून 2 हजार 306 अर्ज प्रलंबित आहे. तसेच 53 अर्जांमध्ये त्रुटी असल्याने ते दाखले नाकारण्यात आले आहे. कृषी विषयक एकूण 245 दाखल्यांपैकी 179 दाखले देण्यात आले असून 47 दाखले प्रलंबित आहेत व 19 दाखले त्रुटी असल्याने ते नाकारण्यात आले. जातीच्या दाखल्यांचे मोठ्या प्रमाणात वितरण झाले असून एकूण 24 हजार 14 दाखल्यापैकी 19 हजार 367 दाखल्यांचे वितरण करण्यात आले असून 4 हजार 227 दाखले प्रलंबित आहेत त्यावरही लवकरचं कार्यवाही करुन प्रकरणे मार्गी लावले जाणार आहेत. जातीच्या दाखल्यामंध्ये एकूण 420 अर्ज नाकारण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात डोंगराळ भागात राहणाऱ्या एकूण 441 नागरिकांपैकी 402 नागरिकांना डोंगरी भाग अदिवास दाखले देण्यात आले आहे. त्यामध्ये 37 अर्ज प्रलंबित असून फक्त 02 प्रकरणे नाकारण्यात आले आहे. तसेच 35 भूमिहीन कामगारांना भूमिहीन असल्याचा एकूण 27 भूमिहीन कामगार दाखले देण्यात आले असून त्यामध्ये 7 दाखले प्रलंबित तर 2 प्रकरणे त्रुटी असल्याने नाकारण्यात आले. तसेच जिल्ह्यात 83 अल्पभूधारकांपैकी 64 अल्पभूधारकांना अल्पभूधारक दाखला देण्यात आला असून 19 अर्ज प्रलंबित तर एकही अर्ज नाकारण्यात आला नाही.
जिल्ह्यात एकूण 8 हजार 509 नॉन क्रिमी लेयर दाखल्यांपैकी 6 हजार 796 दाखल्यांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात असून 1 हजार 604 दाखले प्रलंबित असून 109 अर्ज नाकरण्यात आले आहे. तसेच तात्पुरता रहिवास असलेल्या 1 हजार 268 नागरिकांच्या अर्जांपैकी 1 हजार 197 नागरिकांना तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र देण्यात आले, त्यामध्ये एकूण 69 अर्ज प्रलंबित असून 2 अर्ज नाकारण्यात आले. महिलांना तीस टक्के महिला आरक्षणामध्ये 111 अर्ज पैकी 86 अर्जांना दाखले देण्यात आले असून 25 अर्ज प्रलंबित तर एकही अर्ज नाकारण्यात आला नाही. तसेच आर्थिक क्षमतेसाठी 182 अर्जांपैकी 171 अर्जदारांना दाखले देण्यात आले असून 8 अर्ज प्रलंबित तर 3 अर्ज त्रुटी असल्याने नाकरण्यात आले आहे.