नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १५ मार्च) १३७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: ७८८, नाशिक ग्रामीण: ४०७, मालेगाव: १४९ तर जिल्हा बाह्य: ३२ रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर: ३ आणि नाशिक ग्रामीणमध्ये ३ रुग्णांचा समावेश आहे.
नाशिक शहरात मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे’: १) नागसेन नगर, वडाळा, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला, २)फ्लॅट क्र.५१ ब,पदम दर्शन अपार्टमेंट, कामठवाडे,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष , ३)चेतना नगर,फ्लॅट क्र.४, श्रीकृष्ण अपार्टमेंट,रविवार कारंजा येथील ९१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती यांचा समावेश आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
