नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४ ऑक्टोबर) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४ ऑक्टोबर) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४ ऑक्टोबर) एकूण १२९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ४०, नाशिक ग्रामीण: ८४, तर जिल्हा बाह्य: ५ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ७१ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: व्यायाम करतांना तोल गेल्यामुळे गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू
पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात नाशिकचे तीन तरुण जागीच ठार
नाशिक: तलवारीने केक कापायला गेले, सेलिब्रेशन झालं पोलीस कोठडीत..